जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:02+5:302021-08-29T04:35:02+5:30
या वर्षीच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्याने तसेच सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी ...
या वर्षीच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्याने तसेच सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांनी धान राेवणी केली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान राेवणी केली. त्यांचे पीक करपत आहे, तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. थाेडाफार पाऊस पडत असला तरी याेग्य उत्पादन घेण्यासाठी पुरेसा नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाने त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर किमान २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष राेहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा बारसागडे, जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे, नीता सहारे, सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, युवक आघाडीचे नरेंद्र रायपुरे यांनी केली आहे.