इकॉर्नियामुळे तलावातील जलसाठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:28+5:302021-03-20T04:36:28+5:30

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये ...

Decrease in water storage in the lake due to icornia | इकॉर्नियामुळे तलावातील जलसाठ्यात घट

इकॉर्नियामुळे तलावातील जलसाठ्यात घट

googlenewsNext

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा स्थानिक प्रशासनामार्फत दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर दरवर्षी पावसाळ्यात लिलावातून मालकी प्राप्त झालेले नागरिक येथे मत्स्यबीज टाकतात. दिवाळी व मकर संक्रांतीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. वाढ झाल्यानंतर मत्स्यबीजाची विक्री करण्याकरिता संबंधित नागरिक तलावातील मासे पकडतात. परंतु अनेक तलावांना इकॉर्निया वनस्पतीचा विळखा असल्याने मासे पकडण्यासाठी योग्य प्रकारे जाळे टाकता येत नाही. जवळपास दोन ते तीन फूट ही वनस्पती वाढते. दरवर्षी एप्रिल महिन्यात फूल येऊन त्यातील बिया खाली गळतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या उगवतात. विशेष म्हणजे एका वर्षी वाढलेली ही वनस्पती तलावात पूर्णत: कुजून मातीमोल होते. त्यामुळे तलावाच्या आतील भाग दरवर्षी उथळ होत असते. याचा परिणाम पाणी साठवणुकीवर होत आहे.

Web Title: Decrease in water storage in the lake due to icornia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.