जयरामपुरात व्यायाम साहित्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:54+5:302021-06-24T04:24:54+5:30

जिल्ह्यात पोलीस व वनविभागात रिक्त पदांची भरती केली जाते. या भरतीत तयारीनिशी सहभाग घेता यावा, याकरिता युवकांना व्यायाम करण्यासाठी ...

Dedication of exercise equipment at Jayarampur | जयरामपुरात व्यायाम साहित्याचे लोकार्पण

जयरामपुरात व्यायाम साहित्याचे लोकार्पण

Next

जिल्ह्यात पोलीस व वनविभागात रिक्त पदांची भरती केली जाते. या भरतीत तयारीनिशी सहभाग घेता यावा, याकरिता युवकांना व्यायाम करण्यासाठी साहित्याची गरज हाेती. ही गरज ओळखून जि. प. सदस्य गण्यारपवार यांनी उपसरपंच हरीश निखाडे यांना जिल्हा कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले होते. प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली. त्यानुसार क्रीडा साहित्य मंजूर झाले. नऊ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून मंजूर हाेऊन ग्रामपंचायत जयरामपूर येथे प्राप्त झाल्याने २२ जून रोजी जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते लाेकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच दीपाली सोयाम, पंचायत समिती सदस्य सुरेश परसोडे, उपसरपंच वासुदेव भोयर, गणपूरचे सरपंच सुधाकर गद्दे, ग्रामसेवक ए. आर. पंद्रे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश ताटपल्लीवार, दादाजी तलांडे, सतीश कुडते, ज्योती शेंडे, प्रेमिला कन्नाके, माजी सरपंच हरीश निखाडे व नागरिक उपस्थित हाेते.

===Photopath===

220621\0910img-20210622-wa0091.jpg

===Caption===

जि प सदस्य अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते व्यायाम साहित्याचे लोकार्पण फोटो

Web Title: Dedication of exercise equipment at Jayarampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.