आलापल्लीत माळी समाज भवनाचे लाेकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:50+5:302021-06-25T04:25:50+5:30
माळी समाजाच्या रूढी-परंपरा तसेच चालीरीती यांची जोपासना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी अडचणी येत हाेत्या. यासाठी माळी ...
माळी समाजाच्या रूढी-परंपरा तसेच चालीरीती यांची जोपासना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी अडचणी येत हाेत्या. यासाठी माळी समाजबांधवांनी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देऊन समाज भवन बांधकामाची मागणी केली हाेती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२१ ला भूमिपूजन करण्यात आले. अवघ्या चार महिन्यात बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर मंगळवारी समाज भवनाचे लाेकार्पण करण्यात आले. आलापली-वेलगूर क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून समस्या आ वासून उभ्या आहेत. यापूर्वीच्या लाेकप्रतिनिधींनी समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने विकास कामे झाली नाही. मी निवडून आल्यानंतर अनेक कामे केली. तरीसुद्धा भरपूर कामे करायची आहेत. माळी समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला, याचे आपल्याला समाधान आहे, असे प्रतिपादन अजय कंकडालवार यांनी केले.
माळी समाज भवनाचे बांधकाम १० लाख रुपयांचा निधी खर्च करून पूर्ण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुगंधा मडावी, बेबी आत्राम, भाग्यश्री बेजनवार, सुनीता कडते, वेलगूरचे उपसरपंच उमेश माेहुर्ले, माजी सरपंच दिलीप गंजिवार, माळी सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषाेत्तम सोनुले, प्रशांत गोडसेलवार, जुलेख शेख उपस्थित होते. विशाल रापेल्लीवार यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले.
===Photopath===
240621\24gad_2_24062021_30.jpg
===Caption===
माळी समाज भवनाच्या लाेकार्पणप्रसंगी उपस्थित जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, साेबत सभापती तलांडे.