गडचिरोलीतील रस्त्यालगतचे मटन मार्केट हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:04 AM2019-05-17T00:04:07+5:302019-05-17T00:04:43+5:30

आठवडी बाजाराच्या जागेवर गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने आठवडी बाजाराच्या जागेवर असलेले मटन मार्केटची दुकाने हटविली. त्यांना त्याच ठिकाणी दोन रांगांमध्ये दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Defective Mutton Market in Gadchiroli Road | गडचिरोलीतील रस्त्यालगतचे मटन मार्केट हटविले

गडचिरोलीतील रस्त्यालगतचे मटन मार्केट हटविले

Next
ठळक मुद्देनगरपरिषदेची कारवाई : आठवडी बाजारात दुकान गाळ्यांच्या बांधकामाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आठवडी बाजाराच्या जागेवर गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने आठवडी बाजाराच्या जागेवर असलेले मटन मार्केटची दुकाने हटविली. त्यांना त्याच ठिकाणी दोन रांगांमध्ये दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आठवडी बाजारात कोट्यवधी रुपये खर्चून दुकान गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. जवळपास अर्ध्या जागेवर बांधकाम होत आले आहे. आठवडी बाजाराच्या परिसरातच मटन मार्केट आहे.
मटन मार्केटमधील दुकाने हटवून त्या ठिकाणी सुध्दा दुकान गाळे बांधले जाणार आहेत. नगर परिषदेने यापूर्वीच दुकानदारांना नोटीस देऊन दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र दुकानदार स्वत:हून दुकाने हटवत नव्हते.
त्यामुळे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत गुरूवारी नगर परिषदेची जेसीबी आणली. जेसीबी बघताच दुकानदारांनी स्वत:हून दुकाने काढण्यास सुरूवात केली. काही दुकानदारांनी पक्के बांधकाम केले होते. सदर बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.
दुकाने हटविण्याची कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोड, अभियंता अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनात कर विभागाचे अधिकारी भांडारकर, नितू सोनवाने यांच्यासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, नगरसेवक संजय मेश्राम यांनी भेट दिली.
मटन मार्केट कायमचे हटवा
गडचिरोलीतील मटन मार्केट अगदी शहराच्या मध्यभागी आहे. सभोवताल वस्ती आहे. या मटन मार्केटमधील दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे मटन मार्केट कायमचे शहराबाहेर हटवावे, अशी मागणी नजीकच्या हनुमान वार्डातील महिलांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. मटन मार्केटसाठी स्वतंत्र जागा शोधणे सुरू आहे. तोपर्यंत जुन्याच जागेवर मटन मार्केट ठेवले जाईल, अशी माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Defective Mutton Market in Gadchiroli Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार