शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:00 AM2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:42+5:30

दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

Delay by Gram Panchayat in resolving school resumption | शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

googlenewsNext
ठळक मुद्देभेंडाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे नुकसान

राेशन थाेरात
लाेकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात परिसरातील फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेेने या ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासंबंधी ठरावाची मागणी केली आहे.  मात्र,  देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. 
दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.

जिल्हाभरातही हीच स्थिती
शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक गावचे विद्यार्थी येतात. ज्या गावचे विद्यार्थी आहेत, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची संमती असणे आवश्यक आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अजूनपर्यंत ठरावच घेतले नसल्याने त्या गावातील विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी लवकर ठराव घेण्याची गरज आहे. 

पहिले ते सातवीचेही वर्ग सुरू करण्याची जाेर धरताहे मागणी

- जिल्हा व राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. गडचिराेली जिल्ह्यात केवळ आता ७० रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर अजूनपर्यंत शाळाच बघितली नाही.
- काेराेनाचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते. ग्रामीण भागात काेराेनाचा फारसा प्रसार झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. काही हाेतकरू शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून शिकवत आहेत.

 

Web Title: Delay by Gram Panchayat in resolving school resumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.