मुख्याध्यापकांना हटवा, आश्रमशाळा वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:22 PM2019-04-22T22:22:06+5:302019-04-22T22:22:19+5:30

भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.

Delete the headmasters, save the ashram school | मुख्याध्यापकांना हटवा, आश्रमशाळा वाचवा

मुख्याध्यापकांना हटवा, आश्रमशाळा वाचवा

Next
ठळक मुद्देपालकांची मागणी : विद्यार्थ्यांचा मृत्यू व गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील चिचोडा येथील संत मानवदयाल प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच वैतागले आहेत. तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर मिळालेल्या सानुग्रह अनुदानातील गैरव्यवहारप्रकरणी सदर मुख्याध्यापकाला या आश्रमशाळेतून हटवा, अन्यथा पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.
यासंदर्भातील प्रगतीशिल शेतकरी सीताराम मडावी यांच्यासह ५३ गावकऱ्यांच्या सहीचे निवेदन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात नमूद केल्यानुसार सदर आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भात मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणाºया सामुग्रह अनुदानात पाच विद्यार्थ्यांच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दोषीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे पालकवर्गात रोष व्यक्त होत आहे.
मुख्याध्यापक एस.बी.अलोणे यांच्यावर ३० एप्रिलपर्यंत कारवाई करून या शाळेतून न हटविल्यास शाळेला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा निवेदनातून पालकांनी दिला आहे.

Web Title: Delete the headmasters, save the ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.