फलक हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:56+5:302020-12-28T04:18:56+5:30
गडचिरोली : तालुक्यातील विश्रामपूर-बाम्हणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमण करताना नागरिकांना प्रचंड त्रास ...
गडचिरोली : तालुक्यातील विश्रामपूर-बाम्हणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमण करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
अनावश्यक फलक हटवा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.
कार्यालयांमध्ये दस्तावेजांचा पसारा
गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाईलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाईल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाईलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे.
शहरातील नळांना मीटर लावण्याची मागणी
गडचिरोली : शहरातील विविध वॉर्डात अनेक नळधारकांच्या घरी नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. नळाला मीटर लावण्याची मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय विहिरींवर खासगी पंपांचा कब्जा
आरमोरी : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्राम पंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे, असा आरोप होत आहे.
अडपल्लीत फवारणी करा
गडचिरोली : नजीकच्या अडपल्ली येथील अनेक वार्डातील अनेक नाल्या साचल्या आहेत. तसेच परिसरात मोठमोठ्या खड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवासी निवाऱ्याची गरज
गडचिरोली : गडचिरोलीवरून आरमोरी, देसाईगंज तसेच ब्रम्हपुरी, नागपूरकडे प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. मात्र आरमोरी मार्गावर प्रवासी निवारा नसल्याने त्रास होत आहे. प्रशासनाने येथे प्रवासी निवारा निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कडेलगत वाहनांची गर्दी
गडचिरोली : चामोर्शी मार्गाने सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. दरम्यान या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलीस व परिवहन विभागाने वाहनावर कारवाई करावी.
ताडगाव मार्ग खड्ड्यात
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगाव पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले मात्र अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
निवासस्थाने ओसाड
आलापल्ली : शासनाने लाखो रूपये खर्च करून येथे कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाºयांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. त्यामुळे त्यांची अल्पावधीतच दुरवस्था हाेत असल्याचे दिसून येत आहे.
तारांमुळे वाढला धोका
आलापल्ली : शहरातील मुख्य परिसर तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच आहे. लाेंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.