खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे हटवा

By admin | Published: June 15, 2016 02:12 AM2016-06-15T02:12:02+5:302016-06-15T02:12:02+5:30

गडचिरोली शहरातून चंद्रपूर व नागपूरकडे दररोज खासगी ट्रॅव्हल्स जातात. या ट्रॅव्हल्सने मुख्य रस्त्यावरच आपले थांबे निर्माण केले आहेत.

Delete unauthorized stay of private travels | खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे हटवा

खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे हटवा

Next

पोलीस व आरटीओंचे दुर्लक्ष : शहरात वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : गडचिरोली शहरातून चंद्रपूर व नागपूरकडे दररोज खासगी ट्रॅव्हल्स जातात. या ट्रॅव्हल्सने मुख्य रस्त्यावरच आपले थांबे निर्माण केले आहेत. चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स धानोरा मार्गावर महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीसमोर अनधिकृतपणे थांबविल्या जात आहे. तर नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आरमोरी मार्गावर अनधिकृतपणे मुख्य रस्त्यावर थांबविल्या जात आहे. या ट्रॅव्हल्सच्या थांब्यामुळे अनेकदा वाहनचालकांना आपले वाहन काढण्यासाठी जागाही राहत नाही. वाहतूक पोलीस या प्रकाराकडे बघ्याची भूमिका घेऊन आहे तर आरटीओही मलिदा मिळत असल्याने आंधळ्याचे सोंग घेऊन आहेत. यापूर्वी परिवहन आयुक्तांनी या गाड्यांचे थांबे गावाबाहेर हलविण्याचे आदेश दिले होते. परंतु आरटीओने याची अंमलबजावणी केलेली नाही.

Web Title: Delete unauthorized stay of private travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.