अतिक्रमण हटविणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:54 AM2018-07-11T00:54:18+5:302018-07-11T00:55:22+5:30

तहसील कार्यालय परिसरातून नागरिकांचे आवागमन होऊ नये, यासाठी तहसीलदार कैलास अंडिल यांनी पोलीस बंदोबस्तात वॉर्ड क्र.५ मधील अतिक्रमन काढले व रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. हे अन्यायकारक असल्याचे मत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Deletion of encroachment is inappropriate | अतिक्रमण हटविणे अयोग्य

अतिक्रमण हटविणे अयोग्य

googlenewsNext
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे मत : भामरागड तहसील कार्यालयाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तहसील कार्यालय परिसरातून नागरिकांचे आवागमन होऊ नये, यासाठी तहसीलदार कैलास अंडिल यांनी पोलीस बंदोबस्तात वॉर्ड क्र.५ मधील अतिक्रमन काढले व रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. हे अन्यायकारक असल्याचे मत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ज्या ठिकाणी अतिक्रमण होते, ती जागा महसूल विभागाची नाही. या कारवाईमुळे विवेक हलदार यांच्यावर अन्याय झाला आहे. नोटीस दिल्यानंतर एका तासानंतरच कारवाई करण्यात आली. याबाबत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप भामरागडच्या नगराध्यक्ष संगीता गाडवे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष हरीभाऊ रापेल्लीवार यांनी केला आहे.
याबाबत तहसीलदार कैलास अंडिल यांना विचारणा केली असता, तहसील कार्यालयाच्या भिंतीला लागून काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली. मात्र आता जाण्यासाठी दुसरा रस्ता काढून दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Deletion of encroachment is inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.