रक्षाबंधनातून दारूबंदीची ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:31 AM2019-08-21T00:31:11+5:302019-08-21T00:31:44+5:30

तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची राखीची ओवाळणी आहे, अशी मागणी महिलांनी केली.

Delivery of ammunition from Raksha Bandhan | रक्षाबंधनातून दारूबंदीची ओवाळणी

रक्षाबंधनातून दारूबंदीची ओवाळणी

googlenewsNext
ठळक मुद्देपैसे नको, दारूविक्री थांबवा : पाच गावांसह आरमोरी शहरातील महिलांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची राखीची ओवाळणी आहे, अशी मागणी महिलांनी केली.
समाजातील सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. पोलीस त्यासाठी तत्परही आहे. पण तालुक्यातील काही गावांमध्ये दारूची छुप्यामार्गाने विक्री होत आहे. परिणामी या गावांतील महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा भांडणतंटे होतात. गावात सलोख्याचे वातावरण तयार होण्यासाठी गावातील दारूविक्री बंद होणे आवश्यक आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटा आदी गावासह आरमोरी शहरातील एकूण ५२ महिलांनी मंगळवारी आरमोरी पोलीस स्टेशन गाठून रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बोनसे यांच्यासह ३८ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांना राखी बांधताना महिलांनी, ह्यगावात कधी चोरून लपून तर कधी उघडपणे दारूविक्री होत असते. याचा त्रास आया-बहिणींनाच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, दादा आम्हाला तुमचाच आधार आहे. आम्हाला एका रुपयाही नको. राखीची ओवाळणी म्हणून केवळ ‘आमच्या गावातील दारूविक्री बंद करा. हीच आमची ओवाळणी’, अशी भावनिक भेट वचनाच्या रुपात मागितली.
यावेळी महिलांनी गावातील इतर समस्याही मांडल्या. मुक्तिपथ तालुका चमूने या कार्यक्रमाचे नियोजन केले.

विक्रेत्यांवर कारवाई करू
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दारूविक्री बंद करण्याची हमी देतानाच दारू पिणाऱ्याकडून तसेच व्यसनी नवऱ्याकडून त्रास असल्यास नक्की सांगा, आम्ही तातडीने कारवाई करण्याचे वचन महिलांना दिले. गाव संघटनांना सोबत घेऊन दारुविक्रेत्या-विरोधात कठोर कारवाई करणार असेही ते म्हणाले.

Web Title: Delivery of ammunition from Raksha Bandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.