व्यावसायिकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:34 AM2020-12-31T04:34:24+5:302020-12-31T04:34:24+5:30
भामरागड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला ...
भामरागड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
शौचालयाचा वापर हाेतोय कमीच
आलापल्ली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे.
अरुंद रस्त्यांवर ट्रॅव्हल्सचा मुक्काम
गडचिराेली : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबणा
धानाेरा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.