पन्नेमाराजवळ पूल बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:49 AM2019-03-17T00:49:10+5:302019-03-17T00:49:40+5:30

तालुक्यातील पन्नेमारा-होचेटोला मार्गावर असणाऱ्या नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पूल बांधकामाची मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे सातत्त्याने दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो.

Demand for building a bridge near Panamara | पन्नेमाराजवळ पूल बांधण्याची मागणी

पन्नेमाराजवळ पूल बांधण्याची मागणी

Next
ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : चार महिने करावा लागतो धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील पन्नेमारा-होचेटोला मार्गावर असणाऱ्या नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पूल बांधकामाची मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे सातत्त्याने दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात तीन ते चार महिने सदर मार्ग बंद राहत असतो. मुरूमगावपासून तीन किमी अंतरावर पन्नेमारा-होचेटोला दरम्यान नाला आहे. या भागातील नागरिक सदर नाला ओलांडून धोकादायक प्रवास करतात. विशेष म्हणजे, होचेटोला गावाजवळ दोन मोठे नाले आहेत. पावसाळ्यात दोन्ही नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे येथून आवागमन करण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणी येतात. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास नागरिक विविध साधनांच्या माध्यमातून नाला पार करतात. दरम्यान एखाद्या रूग्णाला उपचारार्थ तालुका स्तरावर नेत असताना अडचणी येतात.
धानोरा व मुरूमगावशी या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना दैैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक पावसाळ्यापूर्वी करावी लागते. अनेक नागरिक पूर्वीपासूनच साहित्याची जुळवाजुळव करतात. तरीसुद्धा अनेक समस्या उद्भवतात. परिणामी नाईलाजास्तव त्यांना त्रास सहन करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Demand for building a bridge near Panamara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.