एमआयडीसीत सवलती देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:14+5:30
जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली. ९०० एकर जागा असतानाही देसाईगंज येथील एमआयडीसीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. वनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गाव तेथे व्यायामशाळा व क्रीडांगणाचे नियोजन करावे. उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली. ९०० एकर जागा असतानाही देसाईगंज येथील एमआयडीसीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. वनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची गरज आहे. उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे धोरण आखावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीश मोटवानी, विनित शर्मा, निलोफर शेख, आरती लाहेरी उपस्थित होते.गडचिरोली जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक-युवतींच्या अंगी सुप्त गुण आहेत. शरीरयष्टी सुदृढ राहण्यासाठी व शारीरिक व बौद्धिक क्षमता टिकून ठेवण्यासाठी व्यायामशाळा व क्रीडांगणाची गरज आहे. व्यायामशाळा व क्रीडांगणासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी ना.सुनील केदार यांच्याकडे केली.
देसाईगंजात पालकमंत्र्यांचा सत्कार
जिल्हा दौºयादरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देसाईगंज येथे भेट दिली असता त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी आ. आनंदराव गेडाम, नगराध्यक्ष शालू दंडवते, आरीफ खानानी, गणेश फाफट, सुनील बोडे, विक्की रामानी, संदीप दहिकर, कपिल बोरकर, गौरव खिलवानी, रफिक शेख व कार्यकते उपस्थित होते.