अंबेझरा गावात पक्के रस्ते बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:18+5:302021-04-25T04:36:18+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर अंबेझरा हे गाव आहे. आवलमरी ग्रामपंचायतमध्ये या गावाचा समावेश आहे. आवलमरीपासून अंबेझरापर्यंतचे अंतर ...
अहेरी तालुका मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर अंबेझरा हे गाव आहे. आवलमरी ग्रामपंचायतमध्ये या गावाचा समावेश आहे. आवलमरीपासून अंबेझरापर्यंतचे अंतर १२ कि.मी. आहे. चारही बाजूने जंगल व डाेंगरांचा वेढा आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्याअभावी गावात बैलगाडीशिवाय माेठी वाहने जात नाही. शासन-प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष या गावाकडे राहिले आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. गावापासून १२ ते १५ कि.मी. अंतरापर्यंत पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे व्यक्ती आजारी पडल्यास व त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आल्यास खूप अडचणी येतात. शेती व्यवसाय मुख्य असतानाही येथे सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच नागरिकांना शेती करावी लागते. अनेकदा नापिकी व दुष्काळाचा सामना शेेतकऱ्यांना करावा लागताे. याशिवाय येथे आराेग्य उपकेंद्र, अंगणवाडी नाही. केवळ प्राथमिक शाळा आहे. साेयी-सुविधांसाठी लाेकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.