रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
By admin | Published: October 6, 2016 02:11 AM2016-10-06T02:11:53+5:302016-10-06T02:11:53+5:30
तालुक्यातील पालोरा येथील १२ शेतकऱ्यांना शेतजमिनीकडे जाणारा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे
पाच वर्षांपासून संघर्ष : पालोरातील शेतकरी अडचणीत
आरमोरी : तालुक्यातील पालोरा येथील १२ शेतकऱ्यांना शेतजमिनीकडे जाणारा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे.
पालोरा येथील १२ शेतकरी शेताकडे जाण्यासाठी रावदेवचा पांदण रस्ता वापरत होते. मात्र गावातील एका शेतकऱ्याने सदर रस्ता मोडीत काढला. भूमिअभिलेख कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांनी सुद्धा व्यवस्थित सर्वे करून दिला नाही. नकाशात पांदण रस्ता स्पष्ट दिसत नसल्याचे म्हटले आहे. रस्ता बंद केल्याने संबंधित शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
मागील पाच वर्षांपासून रस्ता मोकळा करून देण्याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून सदर रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी सुनील सोमनकर, हरिदास सोमनकर, पार्वता बारसागडे, देवकाबाई चिचघरे, ज्योती कोहळे, दौलत बांते, किसन नंदनवार, बंडू कांबळे, जयदेव मुंगीकोल्हे, श्यामलाबाई मने, रमेश मोगरकर, विजय कोल्हटकर, ताराचंद कोल्हटकर, शालिकराम नाकाडे, देवाजी तिजारे, वामन सोनटक्के, पत्रू भांडेकर, मारोती नैताम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)