समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:29 AM2020-12-25T04:29:09+5:302020-12-25T04:29:09+5:30

अनाधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करा देसाईगंज : शहरात अनेक मोबाईल टॉवर नगर परिषदेची परवानगी न घेताच उभारण्यात आले आहेत. ...

Demand for hostel of social welfare department | समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची मागणी

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची मागणी

Next

अनाधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करा

देसाईगंज : शहरात अनेक मोबाईल टॉवर नगर परिषदेची परवानगी न घेताच उभारण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सदर टॉवर उभे आहेत. मात्र न.प.ने टॉवरवर कोणतीही कारवाई केली नाही.

कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात क व्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.

भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.

भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

चातगाव बसथांब्यावर स्वच्छतागृह उभारा

धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सर्वच शेतकºयांना योजनांचा लाभ द्या

अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकºयांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. अनेक शेतकºयांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र सदर जमीन सिंचनाअभावी पडीक राहत असते. ओबीसी शेतकºयांना इतर कृषी योजनांचा लाभ मिळत नाही.

रेतीअभावी शेकडो बांधकामे थंडबस्त्यात

कोरची : रेती घाटाची लिलाव प्रक्रीया रखडली असून तालुक्यात सहज रेती उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महीनाभरापासून रेती मिळत नसल्याने शेकडो बांधकामे थंडबस्त्यात आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री आवास, रमाई घरकूल व शबरी आदिवासी घरकूल आदी योजनामधून जिल्हयात हजारो घरकूल मंजूर करण्यात आल्या आहेत.

नियंत्रणाअभावी सट्टापट्टी जोरात

कुरखेडा : शहरातील अनेक वार्डात खुलेआम सट्टापट्टी घेण्याचे काम एजन्टकडून सुरू आहे. अवैध सट्टापट्टी व्यवसायामुळे अनेक नागरिक बरबाद झाले तर एजन्ट मालामाल होत आहेत. युवक व वृद्ध नागरिकही सट्टापट्टी लावत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असतानाही पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कारवाई होत नसल्याने सत्ता एजन्टची हिंमत वाढत चालली आहे.

Web Title: Demand for hostel of social welfare department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.