फळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:16+5:302021-04-27T04:37:16+5:30

त्यामुळे बाजार फळे विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी त्यांची तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक ...

Demand for making fruit inspection mandatory | फळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी

फळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी

Next

त्यामुळे बाजार फळे विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी त्यांची तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याने १९७९ च्या प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट रेशन अ‍ॅक्ट तयार करून त्यात कलम ४४ (अ, आ) चा अंतर्भाव करण्यात आला आहे. या नियमानुसार अ‍ॅसिलिटीन फळे विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाभरात कार्बाईडने पिकविलेली फळे बाजारात आली आहेत. विशेष करून स्वस्त फळ म्हणून केळीचे सेवन केले जाते; मात्र केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जातो. हे एक प्रकारचे विष आहे. याचे अतिशय घातक परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे फळांबरोबरच बालकांना विषाचेही सेवन करावे लागत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने सदर फळांची बाजारपेठेत खुलेआम विक्री केली जात आहे. या फळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.

Web Title: Demand for making fruit inspection mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.