वाहन परवान्याच्या नावावर पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:17+5:302021-09-07T04:44:17+5:30
५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्यक्ती आपल्या म्हाताऱ्या नातेवाइकांना त्यांच्या सर्व गावी गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी वाहनाने सोडून देत होता. ...
५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्यक्ती आपल्या म्हाताऱ्या नातेवाइकांना त्यांच्या सर्व गावी गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी वाहनाने सोडून देत होता. त्यातील एकाची प्रकृती बरी नसल्याने दुचाकीवर तिघे होते. त्यांना तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्या म्हाताऱ्या महिलेकडून ४०० रुपयांची मागणी केली. कारवाईच्या भीतीने घाबरून जाऊन ती म्हातारी संबंधित कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला ४०० रुपये देणार त्याचवेळी त्याच मार्गाने येणाऱ्या वैरागड येथील सदर लोकमत प्रतिनिधीने हस्तक्षेप केल्यानंतर पैसे न घेता त्या दुचाकी वाहनाला जाऊ दिले.
याच पद्धतीने वैरागड येथील एक व्यक्ती हा ब्रह्मपुरीला उपचारासाठी गेला होता. परतीच्या वेळी त्याच्याकडून कारण नसताना १०० रुपये त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी वसूल केले. वाहन परवान्याचे कारण सांगून व कारवाईचा धाक दाखवून अनेक दिवसापासून सामान्य प्रवाशांना त्रास देण्याचा गोरखधंदा या पोलीस नाक्यावर चालू आहे.
सध्या कोरोनाचा कोणताही संसर्ग नसताना सर्वसामान्य प्रवाशांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची मागणी करून कागदपत्रे नसल्यास पैशाची मागणी केली जाते. या कामात आरमोरी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी केंद्रे आणि होमगार्ड मेश्राम हे अग्रणी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. होमगार्ड प्रवाशांना शिटी मारून वाहन वळवितात आणि प्रवाशांसोबत उद्धट बोलतात अशी तक्रार आहे.
बाॅक्स :
जनावरे तस्करीला अभय
रविवारला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बैलबाजार असतो. या बैल बाजारात कत्तलीसाठी जनावरे विकली जातात. गडचिरोली जिल्ह्यात पशुपालकांची अधिक संख्या असल्याने रविवारी या दिवशी कत्तलीसाठी वाहनात भरलेली जनावरे याच मार्गाने जातात. पण या अवैध व्यवसायावर वाहतूक पोलिसांचा कोणताही वचक नाही. संबंधित कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी समज द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
050921\2458img_20210905_115550.jpg
1) महिलेकडून पैशाची मागणी करताना
2) सर्वसामान्य प्रवाशांची अशी अडवणूक होते