वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्याची मागणी
By Admin | Published: June 25, 2016 01:26 AM2016-06-25T01:26:17+5:302016-06-25T01:26:17+5:30
तालुक्यातील राजपूर पॅच अंतर्गत येत असलेल्या रामपूर चेक येथील वैयक्तिक अतिक्रमणाची जमीन सामूहिक पट्टा म्हणून वितरित केली आहे.
अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅच अंतर्गत येत असलेल्या रामपूर चेक येथील वैयक्तिक अतिक्रमणाची जमीन सामूहिक पट्टा म्हणून वितरित केली आहे. हा सामूहिक पट्टा रद्द करून वैयक्तिक पट्टा देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त नागरिकांनी ग्रा. पं. तील सभेदरम्यान केली आहे.
रामपूर चेक येथील २२ शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. वनहक्क दावे मंजूर करताना ती जमीन त्यांनाच देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता या ४९.९८ हेक्टर आर जमिनीचा सामूहिक वनहक्क पट्टा म्हणून मंजूर करण्यात आला. त्यामुळे नागरिकांची हक्काची जमीन गेली आहे. सदर जमीन त्यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी रवी नेलकुद्री, मल्ला बद्दीवार, मंजूळा चांदेकर, अम्मक चांदेकर, रामय्या पानेमवार, लचमा टेकूल उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)