एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:38 AM2021-09-11T04:38:11+5:302021-09-11T04:38:11+5:30
स्वच्छता मोहीम गतिमान करावी आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ...
स्वच्छता मोहीम गतिमान करावी
आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना आळा घाला
कुरखेडा : शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर बंदी घालणे गरजेचे आहे. काेणाचेच नियंत्रण नसल्याने रस्त्यावर खाद्यपदार्थ बिनधास्तपणे विकले जात आहेत.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
घाेट : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहितीच नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
एटापल्लीत डासांचा प्रादुर्भाव वाढला
एटापल्ली : मागील काही दिवसांपासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. परिणामी डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
नियमित लाईनमन नसल्याने अडचण
काेरची : जिल्ह्यातील बहुतांश गावांत लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित व पूर्णवेळ लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे. दुर्गम भागातील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच विलंब हाेताे.
नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा
वैरागड : रस्त्यांमुळे गावाचा विकास होतो. मात्र पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावा-गावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. पक्क्या रस्त्यांअभावी या भागात वाहतुकीची समस्या वाढली आहे.
बाजारात काेराेना नियमांचा फज्जा
कमलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, धाेका पूर्णत: टळलेला नाही. असे असतानाही काही किराणा व कापड दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. याकडे दुकानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.