गुरनुली-गेवर्धा मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:24+5:302021-02-15T04:32:24+5:30
मालेवाडा : कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी महादेवगड या धार्मिक, निसर्गपर्यटन स्थळाला जोडणाऱ्या गुरनुली-गेवर्धा बायपास मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची ...
मालेवाडा : कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी महादेवगड या धार्मिक, निसर्गपर्यटन स्थळाला जोडणाऱ्या गुरनुली-गेवर्धा बायपास मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
गुरनुली-गेवर्धा मार्गाचे अंतर ३ किमी आहे. या मार्गाने वाहनांची वर्दळ असते. देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवेसाठी याच रस्त्याने रुग्णांना पाठविलेले जाते. तसेच परिसरातील नागरिक याच रस्त्याने आवागमन करीत असतात. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास गुरनुली, अरततोंडी शिवटोला, टेकरीटोला, खरमतटोला, देऊळगाव, शिरपूर, भगवानपूर, वाढोना या पूरग्रस्त गावांना अन्नधान्य, मदत पाेहाेचविण्यास अडचणी येतात.त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे. महाशिवरात्री यात्रेच्या काळात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्याचा उपयाेग हाेऊ शकताे. रस्त्याची दुरुस्ती झाल्यास परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल कुरखेडा बाजारपेठेत पाठविता येऊ शकताे. त्यामुळे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.