भेंडाळा-अनखोडा मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:26 AM2021-07-15T04:26:09+5:302021-07-15T04:26:09+5:30
भेंडाळा-अनखाेडा मार्गावर मोठमोठे खड्डे तर आहेतच, शिवाय बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती बाहेर निघालेली आहे. रात्रीच्या सुमारास ...
भेंडाळा-अनखाेडा मार्गावर मोठमोठे खड्डे तर आहेतच, शिवाय बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती बाहेर निघालेली आहे. रात्रीच्या सुमारास येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे बुजविले हाेते. परंतु अल्पावधीतच अवस्था ‘जैसे थे’ झाली. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर बारीक डांबर उखडून गिट्टी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन घसरण्याची भीती आहे. याचा त्रासही वाहनचालकांना होत आहे. परंतु रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधीसुध्दा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप परिसरातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, भेंडाळा-अनखोडा मार्ग हा अतिशय अरुंद मार्ग आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांसोबत लहान वाहनांनासुध्दा ये-जा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.