विश्रामगृहाच्या दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:33 AM2021-04-05T04:33:09+5:302021-04-05T04:33:09+5:30

ब्रिटिश राजवटीत १९०७ मध्ये इंग्रजांनी सदर विश्रामगृह बांधले. चुना व विटांनी बांधलेल्या या विश्रामगृहाचे छप्पर पूर्वी गवताचे होते. नंतरच्या ...

Demand for repair of rest house | विश्रामगृहाच्या दुरूस्तीची मागणी

विश्रामगृहाच्या दुरूस्तीची मागणी

Next

ब्रिटिश राजवटीत १९०७ मध्ये इंग्रजांनी सदर विश्रामगृह बांधले. चुना व विटांनी बांधलेल्या या विश्रामगृहाचे छप्पर पूर्वी गवताचे होते. नंतरच्या काळात गवत काढून त्यावर कौले अंथरण्यात आली. ब्रिटिश राजवटीत अनेक अधिकारी या विश्रामगृहाचा वापर करीत होते. तसेच श्रीमंत धर्मराव महाराज द्वितीय, राजे भगवंतराव महाराज, राजे विश्वेश्वरराव महाराज हे मुलचेरा परिसरात दौऱ्यावर आल्यास या विश्रामगृहात थांबत होते. मुलचेरा या तालुकास्थळी या विश्रामगृहाशिवाय दुसरे विश्रामगृह नाही. त्यामुळे या विश्रामगृहाची देखभाल करणे आवश्यक आहे. विश्रामगृहात दोरीने ओढायचे पंखे आहेत. बाहेरच्या बाजूने पंख्याची दोरी ओढण्याची सोय आहे. विश्रामगृहात मेज आरसा, ड्रेसिंग टेबल आदी ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वस्तू ठेवल्या आहेत. सदर वस्तू अतिशय दुर्मीळ असल्याने या वस्तूंची जोपासना करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Demand for repair of rest house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.