ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:36 AM2017-12-20T01:36:03+5:302017-12-20T01:36:32+5:30
ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोलीस पाटलांच्या मानधनात ७ हजार ५०० रूपये एवढी वाढ करावी, पोलीस पाटलांना सेवानिवृत्ती योजना लागू करावी, पोलीस पाटलांचे वय ६० वरून ६५ वर्ष करावे, पोलीस पाटलांच्या वारसांना दुसरे पोलीस पाटील नेमताना प्राधान्य द्यावे, पेसा अंतर्गतच्या गावांमध्ये विद्यमान स्थितीत कार्यरत असलेले पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर आदिवासी समाजातील पोलीस पाटील नेमावा, पोलीस पाटलांना प्रवासभत्ता व मानधन लागू करावे, आदी मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी महाराष्टÑ राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भुजंगराज परशुरामकर, जिल्हाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, सचिव मुरारी दहिकर उपस्थित होते.