धानाेरात जंतनाशकाची फवारणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:24+5:302021-04-25T04:36:24+5:30
राेगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गावागावात आरोग्य विभागाचे पथक जाऊन तपासणी करीत आहे. गर्दी वाढू ...
राेगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गावागावात आरोग्य विभागाचे पथक जाऊन तपासणी करीत आहे. गर्दी वाढू नये याकरिता शासनाने आवश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संसर्ग वाढू नये याकरिता शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीसुद्धा धानाेरा येथे काेराेना बाधित आढळून येत आहेत. पहिल्या लाटेत रुग्ण संख्या कमी होती तरी संपूर्ण शहरात जंतनाशक फवारणी करण्यात आली. दुसऱ्या लाटेत काेराेनाने कहर केला आहे. धानोरा तालुक्यात दररोज ३०-३५ बाधित आढळून येत आहेत. तसेच शहरातील पाच नागरिकांचा मृत्यू काेराेनामुळे झाला आहे. शहरात रोगट वातावरण असून अनेक घरी सर्दी-खोकला झाल्याचे रुग्ण आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन काेराेनाचा संसर्ग पसरण्याचा धाेका आहे. शहरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. बिकट स्थिती निर्माण हाेऊ नये यासाठी प्रशासनाने शहरात जंतनाशक फवारणी करावी, अशी नागरिकांनी केली आहे.