उघड्या नालीवर फरशा लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:02+5:302021-04-03T04:33:02+5:30
चामाेर्शी येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या डाव्या बाजूने असलेल्या नालीवर काँक्रीट कव्हर नसल्यामुळे १४ मार्च राेजी तेथे एक म्हैस ...
चामाेर्शी येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या डाव्या बाजूने असलेल्या नालीवर काँक्रीट कव्हर नसल्यामुळे १४ मार्च राेजी तेथे एक म्हैस अडकली होती. ही माहिती युवा संकल्प संस्थेला मिळताच, सदस्यांनी म्हशीला बाहेर काढले. उघड्या नालीत लहान मुलेही काेसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गंभीर समस्येची दखल घेऊन नालीवर सिमेंट काॅंक्रीटच्या फरशा बसवाव्यात, अशी मागणी युवा संकल्प ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वैरागडे, युवा संकल्प ग्रुप चामोशीँ प्रमुख सूरज नैताम, उपप्रमुख प्रशांत चुदरी, सदस्य सूरज चौके, प्रशिक नंदेश्वर, प्रशात कुसराम, विक्की बारसागडे, आकाश गडकर, बजाज नवले, गोपाल नंदेश्वर, डाॅ.विशाल सहारे, ज्ञानेश्वर लटारे, देवराव नैताम, राहुल चिचघरे, स्वप्निल चिचघरे, सोमेश्वर आत्राम, सुरेश आत्राम, अक्षय बारसागडे, रोहित नंदेश्वर, भूषण बारसागडे, मारोती नवले, ध्रुप चिचघरे, ओकटू उंदीरवाडे, श्रावण नवले, मारोती नवले, शंकर गव्हारे, राजू दुधबावरे, अविनाश गव्हारे, भारत वैरागडे, युवराज काटवले, अनुराग नवले, कार्तिक चौके, चेतन मेश्राम, विजय ढाक, अजय भांडेकर, विजय भांडेकर, कुलदीप आत्राम, अश्विन बोदलकार, शेवंता नवले, अल्का नैताम, वर्षा सहारे, दीपक सदुलवार उपस्थित होते.