टरबुजाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:47+5:302021-04-30T04:46:47+5:30

जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्राजवळ असलेल्या शेतांमध्ये गेल्या काही वर्षांपासून परराज्यांतील व्यापारी टरबूज लागवड करत ...

Demand for watermelon increased | टरबुजाची मागणी वाढली

टरबुजाची मागणी वाढली

Next

जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्राजवळ असलेल्या शेतांमध्ये गेल्या काही वर्षांपासून परराज्यांतील व्यापारी टरबूज लागवड करत आहेत. व्यापारी बहुतांश टरबूज नागपूर बाजारपेठेत विक्रीस नेतात तर काही टरबूज शेतमालकास देतात. शेतकरी हे टरबूज जिल्ह्यातील विविध शहरांत, गावातील बाजारपेठेत विक्रीस नेतात. काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या अगोदरपासूनच टरबूज लागवड केली जात आहे. उन्हाळ्यात टरबूज शरीराला थंड करण्यास मदत करते. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात प्रवास केल्यानंतर फळे खाल्ल्यास आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. टरबूज पीक घेण्यासाठी योग्य वातावरणाची आवश्यकता आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या नदीकाठावरील जमिनीत व शेतातही उत्पादन घेतले जाते. पिकाचे संरक्षण करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. मात्र अन्य पिकांपेक्षा ही शेती परवडणारी असल्याने शेतकरी या पिकांकडे वळत चालला आहे.

Web Title: Demand for watermelon increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.