तुळशीत जैविक कीटकनाशक तयार करण्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:58+5:302021-09-08T04:43:58+5:30
भातपिकावरील तुरतुडा, खोडकिडी, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, इत्यादी किडींना आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मेटारायसिम ॲनासोपली या जैविक कीटकनाशकाचा वापर ...
भातपिकावरील तुरतुडा, खोडकिडी, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, इत्यादी किडींना आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मेटारायसिम ॲनासोपली या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाचे वतीने देण्यात आला. तुळशी येथील कृषिमित्र मेघनाथ दुनेदार यांचे घरी जैविक कीटकनाशक तयार करण्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख, कृषी सहायक सुधाकर कोहळे, योगेंद्र बोरकर, कल्पना ठाकरे, विजया औरासे, दुर्गा कोडापे, मेघा कोटांगले व गावातील शेतकरी उपस्थित होते. मेटॉरायझियम ॲनासोपली हे जैविक कीटकनाशक तयार करण्यासाठी २०० लिटर पाणी, गूळ २ किलो, तांदळाचे पीठ २ किलो, इस्ट पावडर ५० ग्रॅम, गोमूत्र २ लिटर व १ लिटर मेटॉरायझियम ॲनासोपली कल्चर आवश्यक असते.
060921\0735img-20210904-wa0027.jpg
तुळशी येथे मेटॉरायझीयम अॕनासोपली हे जैविक बिटकनाशक तयार करण्याचे प्रात्यक्षिक !