पुरात अडकलेल्यांना काढण्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:05+5:302021-06-11T04:25:05+5:30
दरवर्षी पावसाळ्यात अनेक नदी, नाले यांना पूर येतेा. पाण्याचा अंदाज न आल्याने तर काही व्यक्ती जाणूनबुजून पाण्यात शिरतात व ...
दरवर्षी पावसाळ्यात अनेक नदी, नाले यांना पूर येतेा. पाण्याचा अंदाज न आल्याने तर काही व्यक्ती जाणूनबुजून पाण्यात शिरतात व पुराच्या पाण्यात अडकून पडतात. अशावेळी त्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास त्यांचा जी. जातो. पुरात अडकलेल्या नागरिकांना वेळेवर मदत मिळून त्यांचा जी. वाचावा, याकरिता धानोरा येथे तालुका पूर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना या समितीची मदत मिळणार आहे. समिती सदस्यांनी एखादा नागरिक पुरात अडकून पडला असेल तर त्याला काढायचे कसे व वाचवायचे कसे, याबाबत हेटी येथील तलावात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, नायब तहसीलदार दामोदर भगत, हेटी ग्रामपंचायतीचे सरपंच नंदा दुगा आदी उपस्थित हाेते.