ठिकठिकाणी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची धरणे व निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:00 AM2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:01:15+5:30

सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Demonstrations and protests of Panchayat Samiti employees at various places | ठिकठिकाणी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची धरणे व निदर्शने

ठिकठिकाणी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची धरणे व निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध : सिरोंचा बीडीओंवर कारवाई करण्यासाठी पेटले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी चामोर्शी, धानोरा व सिरोंचा येथील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी निषेध आंदोलन केले.
चामोर्शी येथील पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे देऊन बीडीओ उंदीरवाडे यांच्या मनमानीचा निषेध केला. यावेळी लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे विनोद लक्षणे, अमित उरकुडे, खुशाल शेडमाके, शंकरराव बच्चलवार, विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर भोगे, मदनकुमार काळबांधे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे मारोती बहिरेवार, मनतोब बर्मन, कृषी तांत्रिक संघटनेचे रघुनाथ बोरकुटे, राजू नगराळे, आरोग्य संघटनेचे सत्यभागा सूर्यवंशी, लेखा कर्मचारी संघटनेचे मनिष खोबरे, वैशाली प्रधान, ग्रामसेवक संघटनेचे देवानंद फुलझेले, महेंद्र रिलावार, धनंजय शेंडे, यादव खुणे हजर होते.
धानोरा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. तसेच मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी धानोरा यांना सादर केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा धानोराचे सचिव रमेश बोरकुटे, तालुका अध्यक्ष सी. वाय. शिवणकर उपस्थित होते.
सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Demonstrations and protests of Panchayat Samiti employees at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.