आरक्षणासाठी कास्ट्राईबतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:35+5:302021-06-26T04:25:35+5:30
गडचिराेली : अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नतीचे आरक्षण कायम ठेवावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या ...
गडचिराेली : अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नतीचे आरक्षण कायम ठेवावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाभरात आंदाेलन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली, तर तालुकास्तरावरही तहसील कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदाेन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यासाठी शासनाने ७ मे राेजी शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयाचा विराेध करण्यात आला. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सुद्धा आंदाेलनादरम्यान करण्यात आली.
गडचिराेली जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करतेवेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, राज्य उपाध्यक्ष प्रभाकर साेनडवले, पुष्पा पारसे, विद्युतल्लता भानारकर, कास्ट्राईब कर्मचारी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, चंदू रामटेके, राजू उंदीरवाडे, देवेंद्र डाेहणे, रमेश घुटके, नामदेव बन्साेड, विजय कंकलवार, दीपक भैसारे, नरेंद्र खेवले, राजू उंदीरवाडे, नितीन काेडापे, दिगांबर डाेर्लीकर, शंकरापुरे, विनाेद धात्रक, सिद्धार्थ गाेवर्धन, देवेंद्र साेनपिपरे, दीपक भैसारे, विश्वानंद दुधे, डाॅ. नारनवरे, दाैलत घाेडाम आदी उपस्थित हाेते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.