पोषण आहार कर्मचाºयांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:41 AM2017-10-04T00:41:11+5:302017-10-04T00:41:44+5:30
जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळेत दुपारचे भोजन बनविणाºया स्वयंपाकी, मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील .....
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जिल्हा परिषद शाळा व खासगी अनुदानित शाळेत दुपारचे भोजन बनविणाºया स्वयंपाकी, मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाºयांनी कुरखेडा गटसाधन केंद्रासमोर निदर्शने केली व अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा दिला.
शालेय पोषण आहार कर्मचाºयांना शासन केवळ मासिक एक हजार रूपये मानधन देत आहे. वाढत्या महागाईमध्ये सदर मानधनाची रक्कम अत्यंत तुटपूंजी आहे. पुणेच्या शिक्षण संचालकांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी मासिक पाच हजार रूपये मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. ३० मार्च २०१७ रोजी वित्तमंत्री व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत बैठक पार पडली. यामध्ये पाच हजार रूपये मानधनवाढ त्वरित लागू करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. परंतु त्याची पूर्तता झाली नाही. पांडेचेरी, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये आठ हजारांपेक्षा अधिक मानधन दिले जात असल्याची बाब मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. अजूनपर्यंत मानधनवाढ लागू केली नाही. ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील संसद भवनावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.