एटापल्लीत शिवसैनिकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:41 AM2021-08-25T04:41:47+5:302021-08-25T04:41:47+5:30
राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करून यापुढे ...
राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला. निदर्शने करताना शिवसेना एटापल्ली तालुकाप्रमुख मनीष दुर्गे, युवा नेते राघव सुलवावार, शाखाप्रमुख दीपक दत्ता, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, प्रफुल्ल येरणे, अहेरी विधानसभा महिला संघटिका पौर्णिमा इष्टाम, तुळजा तलांडे, महेंद्र सुलवावार, मनीष इष्टाम, दिलीप सुरपाम, इशांक दहागावकर, राहुल कुळमेथे, तनुज बल्लेवार, राजेश हजारे, शुभम डोमलवार, गौरव पेटकर, हेमंत गावडे, रोहित घोष, निहाल कुंभारे, सागर कुलयेती, सचिन कोतरांगे, उमेश मडावी, प्रसन्नजीत करमरकर, प्रसाद दासरवार आदी उपस्थित होते.
(बॉक्स)
जनआशीर्वाद नव्हे जनभावना दुखावण्याची यात्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांचेच नव्हे तर राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राणे यांची ही जनआशीर्वाद नव्हे तर जनभावना दुखावणारी यात्रा असल्याचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी यावेळी म्हटले.