कोरोना काळातही डेंग्यू वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:57+5:302021-02-05T08:54:57+5:30
डेंग्यू हा विषाणूमुळे हाेणारा आजार आहे. डेंग्यू विषाणूचे डेंग्यू-१, डेंग्यू-२, डेंग्यू-३, डेंग्यू-४ असे चार प्रकार आहेत. डेंग्यू राेगाचा प्रसार ...
डेंग्यू हा विषाणूमुळे हाेणारा आजार आहे. डेंग्यू विषाणूचे डेंग्यू-१, डेंग्यू-२, डेंग्यू-३, डेंग्यू-४ असे चार प्रकार आहेत. डेंग्यू राेगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत हाेताे. डासामध्ये विषाणूची वाढ ८ ते १० दिवसांत पूर्ण हाेते. डेंग्यू विषाणूयुक्त डास मरेपर्यंत दूषित राहतो. हा डास ४०० मीटरपर्यंत उडून जाऊ शकतो. तसेच एखाद्या प्रवाशाच्या साधनावर बसून ताे कुठेही जाऊ शकतो. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे राहतात. त्यामुळे या डासाला टायगर माॅस्क्युटाे असे म्हटले जाते. गडचिराेली जिल्ह्यात या डासाचे कमी प्रमाणात रुग्ण आढळून येतात. २०२० या वर्षभरात १३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १६ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेंग्यूचे डास प्रामुख्याने दिवसा चावतात. साठवलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती हाेते. वाॅटर कुलर, भंगार वस्तू व बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे यांमध्ये डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती हाेते.
बाॅक्स ....
डेंग्यूची लक्षणे
अचानक तीव्र ताप येणे, तीव्र डाेकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी, उलट्या हाेणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डाेळेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, ताेंडाला काेरड पडणे, ताप कमी - जास्त हाेणे, अंगावर पुरळ येणे आदी लक्षणे दिसून येतात.
बाॅक्स.....
काय काळजी घ्यावी?
या राेगापासून बचाव करण्यासाठी डास चावणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यामध्ये प्रामुख्याने मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिराेधक क्रीमचा वापर, शरीर झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा. निरुपयाेगी, टाकाऊ, भंगार वस्तूंमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा, अशी माहिती आराेग्य सहायक कालिदास राऊत यांनी दिली आहे.
बाॅक्स ...
कुठल्या वर्षात किती पेशंट
२०१६-२
२०१७-४
२०१८-१३
२०१९-१०
२०२०-१६