तेंदुपत्ता बोनसची रक्कम जमा करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:42+5:302021-08-29T04:34:42+5:30
निवेदनात सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या तीन वर्षाचे तेंदुपत्ता बोनस (राॅयल्टी)चे पैसे मजुरांना मिळाले नाही. ही रक्कम बँकेत जमा आहे, ...
निवेदनात सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या तीन वर्षाचे तेंदुपत्ता बोनस (राॅयल्टी)चे पैसे मजुरांना मिळाले नाही. ही रक्कम बँकेत जमा आहे, रक्कम बँकेत जमा असूनही नगरपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे ही रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही, ही रक्कम पाच ते सात दिवसात मजुरांच्या खात्यात जमा न झाल्यास कोरोनाच्या नियमाला न जुमानता तीव्र आंदोलन करून आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार शासन- प्रशासन असेल, असा इशारा प्रज्वल नागुलवार यांनी दिला.
काेट :
सन २०१७-१८ च्या बोनसची पूर्ण रक्कम वाटप झाली, सन २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षाची रक्कम मरपल्ली, एटापल्ली (टोला),वासामुंडी या तीन गावाची रक्कम जमा झाली. जिवनगट्टा, एटापल्ली, कृष्णार या तीन गावाची रक्कम मजुरांचे नाव व बँक खाता क्रमांक ग्रामकोष समितीने न पाठविल्यांने जमा झाली नाही, मजुराचे नाव व खाता क्रमाक मिळताच बोनसची रक्कम जमा करू.
श्रीराम डाके
प्रशासकीय अधिकारी, नगर पंचायत एटापल्ली