काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने वाढविले डिप्रेशन; औषधांची विक्रीही वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:24 AM2021-06-23T04:24:09+5:302021-06-23T04:24:09+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाने पहिल्यांदाच काेराेना संसर्गाच्या दाेन लाटी अनुभवल्या. त्यात प्रचंड जीवितहानी झाली तसेच फार ...
गडचिराेली : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाने पहिल्यांदाच काेराेना संसर्गाच्या दाेन लाटी अनुभवल्या. त्यात प्रचंड जीवितहानी झाली तसेच फार माेठी आर्थिक हानी झाली. बऱ्याच लाेकांनी आपला राेजगार गमावला. काेराेनाच्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांच्या शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम झाला. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनेसुद्धा अनेक नागरिकांचे डिप्रेशन वाढविले. पूर्वीच्या तुलनेत औषधांची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे.
धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नैराश्य किंवा उदासीनता हा सद्य:स्थितीत बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. १० ते २५ टक्के लोकांना डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेने ग्रासलेले आहे. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, त्यामुळे आलेला दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यांमध्ये नुकसान, पती-पत्नीचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात. दोन आठवडे सतत एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली तर त्याला डिप्रेशन हा आजार झाला आहे असे समजता येईल. काेराेनानंतर डिप्रेशनचे प्रमाण वाढले.
बाॅक्स ........
डिप्रेशन टाळण्यासाठी अशी घ्यावी काळजी
नियमित झाेप घ्यावी. सकारात्मक बाेलावे, सकारात्मक वाचावे, सकारात्मक लाेकांच्या संपर्कात राहावे.
दरराेज किमान ३० ते ४० मिनिटे भरपूर व्यायाम करा, मेडिटेशन / स्वसंमोहन करावे, कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी या उपचारांनी फायदा होतो.
लोकांना मदत करा, लोकांच्या संपर्कात राहावे. इतरांसाठी जे काही करता येईल ते करण्याची नेहमी तयारी ठेवावी, उद्योगामध्ये गुंतून राहावे.
मानसिक राेगापासून स्वत:ला दूर ठेवण्याकरिता सकारात्मक विचार, चांगल्या पुस्तकांचे वाचन, कामाप्रती प्रामाणिकपणा, समाधानी जीवन जगणे आवश्यक आहे. माणसाने स्वत:च्या विकासासाठी स्पर्धा केली पाहिजे, मात्र जळावू वृत्ती वाढू देऊ नये.
बाॅक्स .....
डिप्रेशन का वाढले?
n काेराेना महामारीच्या समस्येने नागरिकांच्या जीवनात बराच बदल घडवून आणला. राेजगार हिरावला. उद्याेगधंदे बंद पडले. एकलकाेंडेपणा वाढला. यासह विविध कारणांमुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढले आहे.
n झाेप न लागणे, भूक न लागणे किंवा जास्त भूक लागणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, डाेकेदुखी, अंगदुखी, अपचन, शाैचाला साफ न हाेणे, विनाकारण रडू येणे, आपण काही चूक केली आहे, पाप केले आहे, असे वाटणे आदी डिप्रेशनची लक्षणे आहेत. नैराश्य व डिप्रेशन काेणत्याही वयात हाेऊ शकते.
बाॅक्स ......
औषध विक्री वाढली
पूर्वीच्या तुलनेत काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डिप्रेशन अर्थात मानसिक राेगाच्या औषधांची विक्री काही प्रमाणात वाढली आहे. गडचिराेली शहरात काही माेजक्याच दुकानांत या आजारावरील औषध मिळतात, असे एका औषध विक्रेत्याने सांगितले.
काेट .....
काेराेना आजारातून बरे झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना दम लागणे, थकवा जाणवणे, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच ‘म्युकरमायकाेसिस’सारख्या अतिगंभीर आराेग्य समस्यांना सामाेरे जावे लागते. अशाप्रकारे शारीरिक, आर्थिक व लैंगिक समस्या बऱ्याच मानसिक राेगांच्या उगमाचे कारण बनते. काेराेना आजाराची माहिती, लक्षणे, उपचार आदींबाबत जनजागृती हाेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवून याेग्यवेळी औषधाेपचार घेतला पाहिजे. साेबतच पाैष्टिक आहार, व्यसनमुक्ती, पुरेशी झाेप, याेगासने, प्राणायाम यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानसिक आराेग्याच्या समस्येबाबत मानसाेपचार तज्ज्ञांकडून सल्ला व औषधाेपचार वेळीच करून घ्यावा.
- डाॅ. मनीष मेश्राम, मानसिक राेगतज्ज्ञ तथा फिजिशियन, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली