जिल्ह्यातील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:05+5:302021-09-02T05:19:05+5:30

येथील प्रगती प्रशिक्षण केंद्रात वंचित बहुजन आघाडीचा तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या ...

The deprived Bahujan Alliance will fight the elections on its own | जिल्ह्यातील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

जिल्ह्यातील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

येथील प्रगती प्रशिक्षण केंद्रात वंचित बहुजन आघाडीचा तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष मंगलदास चापले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरीक्षक बंडूभाऊ ठेंगरे, नितीन रामटेके, माजी जिल्हा अध्यक्ष हंसराज बडोले, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महासचिव केशव समृतवार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे, माजी महिला आघाडी अध्यक्ष मालाताई भजगवळी, जिल्हा सचिव देवानंद दुर्गे, शहर अध्यक्ष प्रवीण उंदीरवाडे, माजी तालुका अध्यक्ष मंजूषा थेरकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यात माजी उपसरपंच पोचुजी कोहवडे, महेश बांगरे, पंकज डायकी, सेवानिवृत नायब तहसीलदार हणमंतू डांभारे यांनी पक्ष प्रवेश केला.

कार्यक्रमाचे संचालन सत्यवान वाळके, प्रास्ताविक ॲड. अनंत उंदीरवाडे यांनी केले. आभार तालुका उपाध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी मानले. यावेळी ॲड. मुरलीधर सहारे, देवानंद दुर्गे, छोटू दुर्गे, रघुनाथ दुधे, लालाजी उंदीरवाडे, प्रभाकर चौधरी, प्रकाश सहारे, सुलीन गोवर्धन, मंजूषा थेरकर, सुषमा वाळके, शुभांगी अलोणे, खिरुताई शिंपी, सुषमा कुळवे, जयश्री सहारे, सावित्री वाळके, उषा मेश्राम, संजीवनी उंदीरवाडे, कल्पना सहारे, संजय देवतले, रघुनाथ दुधे, हमखास खोब्रागडे, अनिल मोहोरकर, सुधाकर रामटेके, जितू झाडे, रमेश साखरे, लालाजी उंदीरवाडे, शुभांगिनी अलोणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

310821/img-20210830-wa0326.jpg

 

वंचित बहुजन आघाडी फोटो

Web Title: The deprived Bahujan Alliance will fight the elections on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.