बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:01+5:302021-09-27T04:40:01+5:30

मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत ...

Deprived of construction labor registration | बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

Next

मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा

गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल असतानाही लाकडे उपलब्ध हाेत नाही. आता गॅसच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत.

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Deprived of construction labor registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.