एसटी बस वाहतुकीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:01+5:30

गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोना मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. केवळ ५ टक्के लोक प्रतिसाद देत नाही.

Deprived front movement for ST bus transport | एसटी बस वाहतुकीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन

एसटी बस वाहतुकीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन

Next
ठळक मुद्देबस स्थानकासमोर वाजविली डफली : जिल्हा बंदी उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यांतर्गत मोजक्याच बसफेऱ्या सुरू आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाची समस्या भेडसावत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळाने एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करून लॉकडाऊन अनलॉक करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी येथील बसस्थानकावर बँडमधील डफली वाजवून नारेबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व आघाडीचे जिल्हा प्रभारी बाळू टेंभूर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, जी.के.बारसिंगे, गुलाब मुगल, महिला आघाडीच्या माला भजगवडी, धर्मेंद्र गोवर्धन, राजेंद्र बांबोळे यांनी केले.
गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोना मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. केवळ ५ टक्के लोक प्रतिसाद देत नाही. सरकारने ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस धरणे थांबविले पाहिजे. १०० टक्के लोकांवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घ्यावे. महामंडळाच्या एसटी सेवा सुरू करून जिल्हा बंदी ताबडतोब उठवावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या आंदोलनात मिलींद बारसागडे, प्रवीणय खोब्रागडे, किशोर फुलझेले, संदीप सहारे, अनिल राऊत, अनिता मडावी, सुनंदा देवतळे, लता शेंद्रे, एन.आर.रामटेके, जगन बन्सोड, अनिल निकुरे, भोजराज रामटेके यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: Deprived front movement for ST bus transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.