अन् उपजिल्हाधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:33+5:302021-07-07T04:45:33+5:30

आरमोरी : तालुक्यातील शंकरनगर येथील प्रगतशील शेतकरी विष्णुपद प्रभास गाईन व कालीपद बरेंद्र सरदार यांनी विविध शासकीय योजनांचा ...

The Deputy Collector reached the farm dam | अन् उपजिल्हाधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर

अन् उपजिल्हाधिकारी पोहोचले शेताच्या बांधावर

Next

आरमोरी : तालुक्यातील शंकरनगर येथील प्रगतशील शेतकरी विष्णुपद प्रभास गाईन व कालीपद बरेंद्र सरदार यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यातून ते वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

याप्रसंगी शंकरनगरचे सरपंच देवदास ढाली, उपसरपंच तपण मलिक, कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे, कृषी सहाय्यक डी. एल. चौधरी, तांत्रिक अधिकारी अश्विनी सहारे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी देवानंद जनबंधू व रवींद्र राऊत तसेच पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

(बॉक्स)

शासकीय योजनांची सांगड घालून उत्पन्न वाढवा

विष्णुपद गाईन यांनी ज्याप्रमाणे मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ घेऊन कृषी विभागाच्या सामूहिक शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग तसेच मग्रारोहयो फळबाग या सर्वांचे संयुक्तरित्या संवर्धन व संरक्षण करून सामूहिक शेततळ्यामध्ये ज्याप्रमाणे मासे पालन केले आहे. त्यामुळे त्यांना वर्षाअखेर पाच लाख रुपयेपर्यंत नफा प्राप्त होत आहे. खरीप व रब्बी हंगामात पिकांची लागवड करून उर्वरित काळात भाजीपाला व मासे पालन करून ते आपले आर्थिक उत्पन्न वाढवित आहेत, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मग्रारोहयो व शासनाच्या इतर योजनांची सांगड घालून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन विजया जाधव यांनी शेतकऱ्यांना केले.

040721\img_20210704_152008.jpg

शंकर नगर येथील शेतकऱ्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी करताना उपजिल्हाधिकारी

Web Title: The Deputy Collector reached the farm dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.