देसाईगंजात वाहतुकीची कोंडी
By Admin | Published: November 11, 2016 01:23 AM2016-11-11T01:23:21+5:302016-11-11T01:23:21+5:30
देसाईगंज बसस्थानकाचा सर्व पसारा देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.
बस स्थानकावरील स्थिती : रस्त्यावरच उभ्या केल्या जातात बसेस
देसाईगंज : देसाईगंज बसस्थानकाचा सर्व पसारा देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस व्यवस्थित रस्त्याच्या बाजुला लावल्या जात नसल्याने वाहतुकीची कोंडी वाढते.
बसस्थानक परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण करून मोठमोठी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अगदी रस्त्यापर्यंत आली आहेत. त्यामुळे मार्ग अरूंद झाला आहे. शहरातील मुख्य मार्गाने दुचाकी वाहने, बस, माल वाहतुक करणारी वाहने मोठ्या संख्येने येत असल्याने वाहनांची वर्दळ राहते. या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस व्यवस्थित बाजुला लावणे गरजेचे असतानाही बसचालक रस्त्यावरच बस उभ्या करून प्रवाशी उतरवितात. याच परिसरात मुख्य बाजारपेठही असल्याने दिवाळीच्या कालावधीत वाहतुकीची कोंडी होत होती. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरच वाहने उभी ठेवण्याचे प्रकार देसाईगंज शहरात वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)