स्वच्छ सर्वेक्षणात देसाईगंज, धानाेरा व भामरागड अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:34+5:30
देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आशिष गेडाम व सिटी को-आँर्डीनेटर लीलाधर जुनघरे यांनी स्वीकारला. धानाेरा नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी स्वीकारला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात नगरपरिषद गटातून देसाईगंज, तर नगरपंचायत गटातून धानाेरा आणि भामरागड नगरपंचायतीने बाजी मारली आहे. नवी दिल्ली येथे २१ नाेव्हेंबर राेजी आयाेजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आशिष गेडाम व सिटी को-आँर्डीनेटर लीलाधर जुनघरे यांनी स्वीकारला. धानाेरा नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपूर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा हे उपस्थित होते.
गडचिराेली शहराचे काय ?
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिराेली नगर परिषदेला दाेन्ही गटामध्ये पुरस्कार पटकाविता आला नाही. गेल्या वर्षीही या पुरस्कारात गडचिराेलीचे गुणांकन अतिशय कमी हाेते. यावर्षी त्यात काेणतीही प्रगती झाली नाही.