देसाईगंज पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:31 AM2021-07-25T04:31:13+5:302021-07-25T04:31:13+5:30
देसाईगंजपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बोळदा गावाच्या शेतशिवारात जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
देसाईगंजपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बोळदा गावाच्या शेतशिवारात जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गडचिरोलीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या विशेष पथकाने व डी.बी. स्कॉडने छापा मारला.
या कारवाईत सात दुचाकी वाहने आणि रोख रकमेसह ४ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये जुगार चालविणारा बाबूराव आको गायकवाड (रा. बोळदा), शेषराव गायकवाड, सुनील रावजी नेवारे, रवींद्र रामदास गायकवाड, विजय शंकर नाकाडे, सुभाष माधव गायकवाड, पितांबर शंकर बावणे, रवींद्र बाबूराव गहाणे (रा.सर्व बोळदा) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
(बॉक्स)
सिंधी कॉलनीतही चालत होती सट्टापट्टी
देसाईगंज शहाराच्या सिंधी कॉलनीत सट्टापट्टी चालविल्या जात असल्याचे कळताच त्या ठिकाणी छापा टाकून विजय श्यामनदास गगनानी यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला. तालुक्यातील दारूबंदी, जुगार व सट्टापट्टीवर सतत कारवाई होत असल्याने व्यावसायिक हादरून गेले आहेत.