निवड होऊनही १३ उमेदवार नियुक्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:46+5:302021-08-22T04:39:46+5:30

सदर पद भरतीची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ...

Despite being selected, 13 candidates were deprived of appointment | निवड होऊनही १३ उमेदवार नियुक्तीपासून वंचित

निवड होऊनही १३ उमेदवार नियुक्तीपासून वंचित

Next

सदर पद भरतीची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालानंतर मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र, या निवड यादीतील केवळ दोन उमेदवारांना जिल्हा प्रयोगशाळेत नियुक्ती देण्यात आली. उर्वरित १३ उमेदवारांना अद्यापही नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात २३ जुलै २०२० ला गडचिरोली येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला निवेदन देण्यात आले, तसेच उपसंचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, नागपूर यांना ३१ जुलै २०२० ला निवेदन देण्यात आले. त्यानंतर १० ऑगस्ट २०२० ला संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे यांनासुद्धा निवेदन देऊन सदर पदभरतीसंदर्भात लक्ष वेधण्यात आले. मात्र, अजूनही या उमेदवारांना याबाबत संबंधित विभागाकडून कळविण्यात आलेले नसल्याचेही अन्यायग्रस्त उमेदवारांनी म्हटले आहे.

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या उपसंचालकांनी या मुद्यांवर विचार करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी देवानंद सुरपाम, वीरेंद्र आत्राम, शुभांगी गिरी, सपना तुरुकमाने, सुमित सोमनाथे, आरती अप्पलवार, सारिका नैताम, रूपेश बल्लमवार, आशिष माटे, प्रमोद सयाम, आकाश मेश्राम, मुरलीधर तुलावी, जीवनदास बावणे या अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे.

Web Title: Despite being selected, 13 candidates were deprived of appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.