काेराेनाचे संकट असतानाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 AM2021-04-08T04:37:31+5:302021-04-08T04:37:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार ...

Despite Kareena's crisis | काेराेनाचे संकट असतानाही

काेराेनाचे संकट असतानाही

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरत असल्याच्या घटनेला वर्षपूर्ती हाेत आहे. आराेग्य विभागाच्या सल्ल्यानुसार अनेक जण इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करीत असले तरी अनेक जण लिंबू, संत्री, माेसंबीसह आंबट फळे व खाद्यपदार्थांना पसंती दर्शवितात. परंतु, गडचिराेली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील नागरिकांचा लिंबू, संत्री, माेसंबी खाण्याकडे कल असल्याने जिल्ह्यात या फळांचे दर स्थिर आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षी मे महिन्यात काेराेना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले हाेते. सुरुवातीपासून गडचिराेली जिल्हा ग्रीन झाेनमध्ये हाेता. जेव्हा जिल्ह्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांनी राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला. याचाच परिणाम अनेक जण बाधित आढळूनही मृत्यूदर अतिशय कमी हाेता. दिवाळी ते संक्रांतीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने घटली हाेती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. याच कालावधीपासून गडचिराेली शहरातही लिंबू, संत्री, माेसंबी फळांची मागणी काहीशा प्रमाणात वाढली. परंतु, माेजकेच ग्राहक असल्याने लिंबू, संत्रीची मागणी वाढूनही दरामध्ये फारसा फरक पडला नाही. १० ते २० रुपयांच्या फरकाने फळाच्या किमती कमी-जास्त झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स ......

माेसंबी हैदराबाद येथून, संत्री नागपूर तर लिंबू चंद्रपूरहून

गडचिराेली जिल्ह्यात लिंबू फळाचे फारसे उत्पादन हाेत नाही. घरगुती अथवा शेतात लिंबू लावून शेतकरी वैयक्तिकच वापर करतात. त्यामुळे जिल्ह्यात चंद्रपूर व नागपूरहून लिंबू विक्रीसाठी येताे. माेसंबी हैदराबाद तर संत्री नागपूरवरून विक्रीसाठी येताे. सकाळपासूनच फळ वाहतुकीची वाहने येथील फळ बाजारात दिसून येतात. स्थानिक स्तरावर माेसंबी व संत्रीचे उत्पादन हाेत नाही. केवळ लिंबूचे उत्पादन अल्प प्रमाणात माेजकेच शेतकरी घेतात; परंतु घरगुती वापर हाेताे.

बाॅक्स .....

केवळ ५ टक्के दरवाढ

जिल्ह्यात फळविक्रीची फारशी माेठी बाजारपेठ नाही. अनेक जण रुग्णांना तसेच नातेवाईकांच्या गावाला जाण्यासाठी फळांची खरेदी करतात. परंतु राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेजकेच लाेक फळे खरेदी करतात. त्यामुळे केवळ ५ टक्के दरवाढ दिसून येत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

काेट .....

माेसंबी, संत्री व लिंबूची मागणी फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. काही लाेक या फळांची खरेदी करीत असले तरी वयाेमानानुसार याेग्य प्रमाणात या फळांचे सेवन करावे.

- डाॅ. तामदेव दुधबळे, चामाेर्शी

काेट.....

लिंबूवर्गीय फळांमध्ये अ व क जीवनसत्त्व तसेच प्राेटिन्स असतात. ही फळे आराेग्यासाठी लाभदायक आहेत. इम्युनिटी पाॅवर वाढविण्यासाठी शरीराला ते लाभदायक आहेत.

- डाॅ. विलास वाघधरे, वैरागड

इम्युनिटी वाढते! मी फळे खाताे तुम्हीही खा!!

काेट ....

लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने राेगप्रतिकारकशक्ती वाढते. परंतु याबाबत ग्रामीण भागात लाेकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अनेक जण आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे खाेकला हाेताे. या गैरसमजातून लिंबूचा वापर आहारात करीत नाहीत; परंतु घरातील आम्ही बहुतेक जण लिंबूचा वापर नेहमीच करीत असताे. हंगामानुसार संत्रीही खात असताे.

- सुधीर बारसागडे, गडचिराेली

काेट .......

राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन आमच्या कुटुंबातील सदस्य करतात. यासह व्यायामावरही भर देतात. परंतु, काेराेना संकटकाळात काही जण लिंबू, संत्री, माेसंबी आदी फळांचे सेवन आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात करीत आहेत. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खावीत.

- विश्वास किरंगे, गडचिराेली

Web Title: Despite Kareena's crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.