वर्ष उलटूनही एकही घरकूल पूर्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:40+5:302021-02-05T08:55:40+5:30
२०२०-२१ या वर्षात जिल्हाभरात ६ हजार ७६ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. घरकूल लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून ...
२०२०-२१ या वर्षात जिल्हाभरात ६ हजार ७६ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. घरकूल लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून ४ हजार ७४८ घरकूल प्रत्यक्षात मंजूर करण्यात आले. घरकूल मंजूर झाले. त्यावेळी अर्धे आर्थिक वर्ष संपले हाेते. त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या कालावधीत शेतीची कामे राहत असल्याने नागरिक घर बांधण्यास सुरूवात करीत नाही. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांनी घरांच्या बांधकामाला सुरुवात केली नाही. २४ जानेवारी राेजी उपलब्ध असलेल्या अहवालानुसार केवळ ३ हजार १८८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. घरकूल बांधकामाला सुरुवात करण्यासाठी पहिला हप्ता दिला जातो. पहिला हप्ता मिळाला असला तरी लाभार्थ्यांनी घरकूल बांधकामाला सुरुवात केली असेलच असे नाही. प्रशासकीय यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बाॅक्स .....
१ हजार ५६० लाभार्थ्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही
घर बांधकामाच्या स्थितीनुसार हप्ते वितरित केले जातात. पहिला हप्ता घर बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच दिल्या जाते. या अनुदानातून अपेक्षित घर बांधकाम हाेणे आवश्यक आहे अन्यथा दुसरा हप्ता दिला जात नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ हजार ७४८ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी केवळ ३ हजार १८८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला आहे. १ हजार ५६० लाभार्थ्यांना अजुनही पहिला हप्ता मिळाला नाही. केवळ ३१ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाला आहे. तर तिसरा हप्ता केवळ दाेन लाभार्थ्यांना मिळाला आहे.
बाॅक्स ...
तालुकानिहाय लाभार्थी
तालुका मंजूर पहिला हप्ता
अहेरी ५४५ ३८३
आरमाेरी ५७१ ४४६
भामरागड २५ २०
चामाेर्शी ९५३ ६४९
देसाईगंज ५९५ ४४९
धानाेरा २०४ १८३
एटापल्ली १० १०
गडचिराेली ५६२ ४७४
काेरची १०५ ९२
कुरखेडा २९१ २६४
मूलचेरा ९२ ८८
सिराेंचा ७९५ १३०
एकूण ४,७४८ ३,१८८