पक्ष्यांच्या शिकारीसाठी लावलेले सापळे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:06+5:302021-05-21T04:39:06+5:30

मे महिन्यात जंगलातील पानवटे, लहान तलावातील पाणी आटत असल्याने याचा फायदा घेत शिकारी शिकारीचा गोरखधंदा करतात. यात हार्वर्ड, कवडी, ...

Destroy bird traps | पक्ष्यांच्या शिकारीसाठी लावलेले सापळे नष्ट

पक्ष्यांच्या शिकारीसाठी लावलेले सापळे नष्ट

googlenewsNext

मे महिन्यात जंगलातील पानवटे, लहान तलावातील पाणी आटत असल्याने याचा फायदा घेत शिकारी शिकारीचा गोरखधंदा करतात. यात हार्वर्ड, कवडी, बारडे अन्य गोजिरवाण्या पक्ष्यांची शिकार केली जाते. पाणवठ्याजवळ झाडांच्या फांद्यांची लहान झोपळी बनवून त्यात लपून बसतात. पाणवठ्याजवळ जाळ पसरून त्यात आधीच पकडून ठेवलेला पक्षी बांधल्या जाते. त्या पक्षाला पाहून इतरही पक्षी आपली तहान भागवण्यासाठी त्या ठिकाणी उतरतात. सापळ्याची दोरी शिकाऱ्याच्या हाती असते आणि पक्षी अलगद जाळ्यात पकडल्या जातात.

एप्रिल-मे महिन्यात तहानलेल्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी सापळे लावण्याचा लावण्याचे अघोरी कृत्य केले जाते. वैरागड येथील काही पक्षिमित्रांकडून अवैध शिकारीचे माहिती मिखच वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक एस. आर. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, वनमजूर मुन्ना मानकर, सोमेश्वर दोनाडकर यांनी नदीपात्र, तलाव, बोड्या येथे लावलेल्या पक्ष्यांच्या शिकारीचे सापळे नष्ट केले.

===Photopath===

200521\img-20210520-wa0033.jpg

===Caption===

शिकारीचे सापडे नष्ट करताना

Web Title: Destroy bird traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.