आठ ड्रम गुळ सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:46 PM2020-06-05T21:46:19+5:302020-06-05T21:46:47+5:30

सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा ताब्यात घेतला आहे. तरीही मोहफूल विक्री सुरूच आहे. गावातील काही विक्रेत्यांनी सडवा टाकल्याची माहिती ग्रामस्थांनी मुक्तिपथ तालुका चमूला दिली.

Destroy eight drums jaggery rot | आठ ड्रम गुळ सडवा नष्ट

आठ ड्रम गुळ सडवा नष्ट

Next
ठळक मुद्देतीन विक्रेत्यांना अटक : अमरावती व माणिक्यापूर येथे पोलिसांची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील अमरावती व माणिक्यापूर या गावांमध्ये मुक्तिपथ तालुका चमू आणि पोलिसांनी संयुक्तपणे वेगवेगळ्या आठ घरी धाड टाकली. यामध्ये पाच घरी आठ ड्रम गुळाचा सडवा सापडला. हा साठा नष्ट करून तीन दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा ताब्यात घेतला आहे. तरीही मोहफूल विक्री सुरूच आहे. गावातील काही विक्रेत्यांनी सडवा टाकल्याची माहिती ग्रामस्थांनी मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यांनी सिरोंचा पोलिसांच्या सहकार्याने येथील चार घराची तपासणी केली. यातील दोन घरी चार ड्रम गुळाचा सडवा पोलिसांना आढळला. हा सर्व साठा पोलिसांनी नष्ट करून दोघांवर कारवाई केली.
पेंटिपाका महसूल गावांतर्गत येणाऱ्या माणिक्यापूर या गावीही अशाच प्रकारे दारू गाळणाऱ्यांनी घरच्या आवारात सडवे टाकल्याची माहिती गावकºयांकडून मुक्तिपथ चमूला मिळाली. या गावीही पोलिसांसोबत धाड टाकून चार घरे हुडकून काढली. यातील तीन घरातून चार ड्रम गुळाचा सडवा सापडला. हा सर्व मुद्देमालही पोलिसांनी नष्ट केला. यावेळी दोन विक्रेत्यांनी पळ काढला तर एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोनही कारवायांमध्ये एकूण २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन नष्ट केला.
सदर कारवाई सिरोंचाचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार दिलीप बोडे, बोरगडे व मारा मडावी यांनी केली. तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. दारूमुळे लोक एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने हा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे दारू गाळणे थांबविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मुक्तिपथ संघटक सुनीता भगत व प्रेरक संतोष चंदावार यांनी कारवाईस सहकार्य केले. कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले.

Web Title: Destroy eight drums jaggery rot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.