वनव्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट हाेण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:21+5:302021-03-07T04:33:21+5:30

मार्च महिन्यापासून मोहफुल वेचणीच्या हंगामाला सुरुवात होते. या हंगामात अनेक नागरिक मोहफुले वेचण्याकरिता जंगलांना आगी लावून जागा स्वच्छ करतात. ...

Destruction of valuable forest resources due to deforestation | वनव्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट हाेण्याचा धाेका

वनव्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट हाेण्याचा धाेका

Next

मार्च महिन्यापासून मोहफुल वेचणीच्या हंगामाला सुरुवात होते. या हंगामात अनेक नागरिक मोहफुले वेचण्याकरिता जंगलांना आगी लावून जागा स्वच्छ करतात. परंतु आग लावल्यानंतर ही विझविली जा नाही. परिणामी पालापाचोळा जंगलात दूरवर जळत जातो. जंगलालगतच्या शेतामधील आग रौद्र रूप धारण करून जंगलात पसरते. वनविकास महामंडळाचे कर्मचारी मुख्यालयी राहून आपापल्या कार्यक्षेत्रात असे प्रकार थांबवू शकतात. मात्र, कंपार्टमेंट क्रमांक १६३ आणि १६४ मध्ये दोन दिवसांपासून दिवसरात्र वणवे लागूनही याकडे कोणाचेही लक्ष नाही. आगी रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास मुलचेरा तालुक्यातील थोड्या प्रमाणात उरलेला हिरवागार जंगलाचाही नायनाट होण्यास विलंब लागणार नाही. एकंदरीत वनविकास महामंडळाचे कर्मचारी आपापल्या बीटअंतर्गत येणाऱ्या गावात अथवा मुलचेरा मुख्यालयात राहत नसल्याने वेळेवर वनवे लागलेल्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

Web Title: Destruction of valuable forest resources due to deforestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.